यावल शहरातील न्यू व्यास नगरातून मोबाईल लांबवला
Mobile phone extended from New Vyas Nagar in Yaval citY यावल : शहरातील विस्तारीत भागातील न्यू व्यास नगरामधून एका घरातून 13 हजार रुपये किमतीचा मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने लांबवला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यावल शहरातील विस्तारीत भागात न्यू व्यास नगर आहे. या न्यू व्यास नगरात रवींद्र श्रावण चव्हाण हे राहतात. ते सुनंदा देवेंद्र खेडकर यांच्या उघड्या प्लॉटमध्ये आले असता त्यांच्या जवळील 13 हजार रुपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरी केला.
यावल पोलिसात गुन्हा दाखल
हा प्रकार निर्दशनास आल्यानंतर त्यांनी प्रारंभी सर्वत्र शोध घेतला मात्र मोबाईल कुठेच मिळून न आल्याने त्यांन यावल पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यानंतर मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.
