वराडसीम गावातील 35 वर्षीय विवाहितेचा विनयभंग
A 35-year-old married woman was molestation in Varadseem village भुसावळ :भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथे 35 वर्षीय विवाहितेचा अश्लील शिविगाळ करीत विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी एकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयिताविरोधात गुन्हा दाखल
वराडसीम गावातील 35 वर्षीय विवाहितेने संशयित आरोपी टीप्या उर्फ इब्राहीम सत्तार मन्यार (वराडसीम, ता.भुसावळ) याच्याविरोधात शिट्या मारून तसेच पाठलाग करीत असल्याची तक्रार दिली होती व त्यानंतर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा राग मनात ठेवून आरोपीने शनिवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास विवाहिता शालिनी दुध उत्पादक संघासमोरून जात असताना आरोपीने पुन्हा विवाहितेला अश्लील शिविगाळ करीत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी विवाहितेने तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार युनूस मुसा शेख करीत आहेत.
