सागवान तस्करांना लाकूड चोरीला विरोध : देवबारी येथील वन विभागाच्या संरक्षण कुटीला लावली आग
Protest against teak smugglers stealing wood: Forest department’s conservation hut at Deobari set on fire यावल : यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या वनविभागाच्या देवबारी संरक्षण कुटीला सहा अज्ञातांनी आग लावून पेटवून दिले. सहा जण राखीव वनक्षेत्रातुन सागवान लाकूड चोरी करून नेतांना वनपाल व वनमजुरांनी त्यांना अडवले होते त्याचा राग येत त्यांनी दगडफेक केली व कुटीयाला पेटवून दिले. यात एक लाख 83 हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. पाच हजार रुपये किंमतीचे सागवान लाकूड घेऊन हे सहा संशयित पसार झाले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सागवान नेण्यास विरोध केल्याने लावली आग
सातपुड्याच्या जंगलात यावल तालुक्यातील देवबारी येथे राखीव वनक्षेत्रात वनविभागाकडून संरक्षण कुटिया उभारण्यात आली आहे. या कुटीयात विविध प्रकारचे वनसंरक्षणाचे साहित्यदेखील ठेवण्यात आले होते. या ठिकाणी वन विभागाचे वनपाल आणि वनमजूर कार्यरत असून जंगलातून अज्ञात सहा जण सागवान लाकूड चोरी करून येत असतांना दिसल्याने वनमजुरांनी व वन कर्मचार्यांनी त्यांना थांबवले. लाकूड जप्तीची कारवाई करीत असल्याचा राग येऊन या सहा जणांनी वनमजूर आणि वन कर्मचार्यांवर दगडफेक केली तसेच संरक्षण कुटियाला आग लावली. या आगीत कुटीयातील एक लाख 83 हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले तसेच संशयितांनी कर्मचार्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत सुमारे पाच हजार रुपये किंमतीचे सागवान लाकूड घेऊन पळ कढला.
अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात वनपाल समाधान धनवड यांनी दिलेल्या फिर्यादी अज्ञात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार युनूस तडवी करीत आहे.
