भुसावळातील उत्तरेकडील भागाचा पाणीप्रश्न सुटणार ! : गडकरी नगर जलकुंभाची चाचणी तिसर्या प्रयत्नात यशस्वी
The water problem of the northern part of Bhusawal will be solved! : Test of Gadkari Nagar aqueduct successful in third attempt भुसावळ : शहरातील उत्तरेकडील भागातील नागरीकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी गडकरी नगर जलकुंभाला अमृतच्या पाईप लाईनने जोडण्यात आले मात्र दोन वेळा झालेल्या चाचणीत लिकेजची समस्या आल्यानंतर यंत्रणेने युद्ध पातळीवर लिकेज दुरुस्ती केल्यानंतर रविवारी दुपारी एक वाजता पुन्हा चाचणी घेण्यात आल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात गडकरी नगर जलकुंभात पाणी आल्याने आता उत्तरेकडील भागात सुरळीत पाणीपुरवठा होणार असून पाण्याच्या रोटेशनमध्ये एका दिवसाचा बदल होणार असल्याचे पाणीपुरवठा अभियता सतीश देशमुख यांनी सांगितले.
उत्तरेकडील भागात होणार सुरळीत पाणीपुरवठा
यापूर्वी गडकरी नगर जलकुंभात नाहाटाजवळील जलकुंभातून पाणी येत असल्याने त्यामुळे पाणीपुरवठ्याला विलंब होत असल्याने अमृत योजनेच्या पाईप लाईनीतून थेट आता पाणीपुरवठा करण्यात आल्याने जलदगतीने गडकरी नगर जलकुंभात पाणी पोहोचणार असल्याने खडका रोड भागात उत्तरेकडील भागात आता सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे.

रविवारी दुपारी झाली चाचणी
रविवारी दुपारी एक वाजता पाणीपुरवठा अभियंता सतीश देशमुख, अमृत योजनेचे नितीन चौधरी, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, संजय आवटे, मुकेश गुंजाळ, देवा वाणी, संतोष भंगाळे आदींच्या उपस्थितीत चाचणी घेण्यात आली. मुख्याधिकारी संदीप चिद्रावार यांनी पाहणी केली तर आमदार संजय सावकारे यांनी सुध्दा पाईप लाईन चाचणीची माहिती घेतली.
