थोरगव्हाण गावातून मध्यरात्री चोरट्यांनी दुचाकी लांबवली
Thieves stole a bike from Thorgavan village in the middle of the night सावदा : येथून जवळच असलेल्या थोरगव्हाण येथून चोरट्यांनी घराबाहेर लावलेली 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी सावदा पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
दीपक दत्तात्रय चौधरी (29, थोरगव्हाण) हे शेतकरी असून त्यांच्याकडे शेती कामासाठी दुचाकी (एम.एच.19 डी.एस.7264) आहे. घराच्या अंगणात त्यांनी दुचाकी लावल्यानंतर शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी संधी साधत 20 हजारांची दुचाकी लांबवली. या प्रकरणी शेतकर्याने धाव घेत तक्रार नोंदवल्याने सावदा पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय पोहेकर करीत आहेत..
