भुसावळात सेंट्रींग कामगारावर चाकूने प्राणघातक हल्ला : आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

मुस्लीम कॉलनी परीसरातून आरोपीला अटक : आरोपीविरोधात घरफोडीचे गुन्हे


Knife attack on centering worker in Bhusawal : Accused in market police net भुसावळ : सेंट्रींग प्लेटचे भाड्याचे पैसे मागितल्याच्या वादातून पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने तरुणाच्या गळ्यावर चाकूने हल्ला करीत तक्रारदाराच्या भावालादेखील मारहाण करण्यात आली. ही घटना शहरातील आठवडे बाजाराजवळील जैन मंदिराजवळ शनिवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयित आकाश उर्फ चॅम्पियन शाम इंगळे (पंचशील नगर, भुसावळ) याच्याविारोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

गळ्यावर तसेच हातावर मारला चाकू
तक्रारदार संदीप प्रकाश लवंगे (31, मच्छी मार्केट, पंचशील नगर, भुसावळ) व त्यांचा भाऊ संतोष लवंगे हे सेंट्रींग काम करतात. त्यांनी संशयिताला सेंट्रींग प्लेट भाड्याने दिल्यानंतर त्यापोटीचे दोन हजार रुपये शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास मागितल्यानंतर संशयिताने त्याच्या घरातून चाकू घेवून येत दोघा भावांना शिविगाळ करीत संतोष प्रकाश लवंगे याच्या गळ्यावर तसेच उजव्या हातावर चाकूने हल्ला करीत दुखापत करीत पळ काढला होता. या घटनेनंतर रक्तबंबाळ अवस्थेत लवंगे यांना उपचारार्थ दाखल करण्यात आल्यानंतर संदीप लवंगे यांनी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यानंतर रविवारी पहाटेच्या सुमारास संशयिताविरोधात भादंवि 307, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

मुस्लीम कॉलनीतून आरोपीला अटक
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हरीष भोये, नाईक निलेश चौधरी, नाईक उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल योगेश माळी, कॉन्स्टेबल प्रशांत सोनार, कॉन्स्टेबल सचिन यशवंत चौधरी आदींनी आरोपीच्या सोमवारी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तपास सहाय्यक निरीक्षक हरीष भोये करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !