चिखलीत किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी : लाठ्या-काठ्या तलवारींचा वापर
30 आरोपींविरोधात परस्परविरोधी गुन्हे : महिलेचा विनयभंग करीत पोतही हिसकावली
मुक्ताईनगर : तालुक्यातील चिखली येथे हळदी कार्यक्रम झालेल्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याने लाठ्या-काठ्या, लोखंडी रॉड व तलवारीचा वापर करण्यात आला तसेच या घटनेत महिलेचा विनयभंग झाला असून या प्रकरणी परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एका गटाच्या 21 जणांविरोधात तर दुसर्या गटाच्या नऊ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गटातील पाच संशयित जखमी झाले आहे.
पहिल्या गटाच्या तक्रारीवरून आठ संशयीतांविरोधात गुन्हा
पहिल्या गटातर्फे शेख समद शेख सुलतान खाटीक (50, चिखली) यांनी तक्रार दिली. त्यानुसार जुन्या वादातून संशयित वैभव जानराव पाटील, रवी उर्फ विक्की जानराव पाटील, राजेंद्र प्रभाकर कांडेलकर, चिंट्टा राजेंद्र कांडेलकर व अन्य चौघांनी तक्रारदारासह त्यांचा मुलगा शोहब व समीर तसेच पुतण्या, प्रभाकर सोनवणे व अनिल खिरवळकर यांना लाथाबुक्क्यांनी तलवारी, चाकू, लाकडी दांड्याने मारहाण केली तसेच नऊ हजार आठशे रुपये हिसकावून शिविगाळ केली.
महिलेचा विनयभंग करीत पोत हिसकावली
दुसर्या गटातर्फे 37 विवाहितेने तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी रात्री 10.30 वाजता त्यांचा मुलगा चिंटू याचा हळद वरातीत वाद झाल्यानंतर संशयितांनी लाठ्या-काठ्या, लोखंडी रॉड व तलवारीने फिर्यादीचे पती व मुलास बेदम मारहाण केली. जखमी अवस्थेत पतीसह मुलास उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर आरोपींनी विवाहितेला पकडले तसेच खाली पाडून तिचा विनयभंग केला तसेच महिलेच्या गुप्तांगावर मारहाण करीत तिच्या मनाला लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केले. यावेळी आरोपींनी विवाहितेच्या गळ्यातील दिड लाख रुपये किंमतीची पोत हिसकावून दुखापत केली. या प्रकरणी शेख समद शेख सुलतान खाटीक (सुभाष खाटीक), विजय नामदेव काकडे, शेख शोएब शेख समद खाटीक, शेख समीर शेख सम्मद खाटीक, शेख जुबेर शेख गुफ्रान खाटीक, प्रभाकर मारूती सोनवणे, गजानन श्रीधर सोनवणे, अनिल रामराव खिरोळकर, जावेद गुफ्रान खाटीक, परवेज गुफ्रान खाटीक, आसीफ मुश्ताक खाटीक, शरीफ सुलतान खाटीक, गजानन रामदास पाटील, मंगेश नारायण खिरोळकर, सोपान कांडेलकर (सर्व रा.चिखली, ता.मुक्ताईनगर) आणि शेख जाकीर शेख शकूर खाटील (रा. मुक्ताईनगर) तसेच अन्य पाच ते सात संशयितांविरोधात दंगल व हाणामारीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास डीवायएसपी प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप दुनगहू, उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, संदीप चेढे, गजमल पाटील करीत आहेत.
