वड्री येथील 25 वर्षीय विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न


A 25-year-old married woman from Vadri attempted suicide यावल : तालुक्यातील वड्री येथील एका 25 वर्षीय विवाहितेने विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले. या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे.

विवाहितेवर ग्रामीण रुग्णालयात उपचार
वड्री, ता.यावल येथील 25 वर्षीय विवाहिता गौरी बारेला हिने संतापाच्या भरात आपल्या घरात विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार कुटूंबीयांच्या लक्षात आल्याने तिला तातडीने उपचाराकरीता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी भुगवाड्या, अधिपरिचारीका दीपाली किरंगे, सुमन राऊत, वैशाली बैरागी, पूनम सोनवणे, संजय जेधे आदींनी तातडीने या विवाहितेवर उपचार सुरू केले असुन सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !