घोडसगावला वीज चोरी : सहा जणांविरोधात गुन्हा


यावल : मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरीविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात आली. मुक्ताईनगर ग्रामीण उपविभाग अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत घोडसगावात सहा जण वीज चोरी करतांना आढळल्याने त्यांना दंडाची नोटीस बजवण्यात आली मात्र त्यांनी दंड न भरल्याने यावल पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

कारवाईने उडाली खळबळ
घोडसगाव ग्रामीण विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता अजय तडवी यांनी पथकासह घोडसगाव या गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवली. त्यात धनराज नारायण मांडवकर, उत्तम सीताराम दुट्टे, कृष्णा नारायण दुट्टे, दीपाली संजय भोई, धनराज हरी बलखंड व सचिन रमेश सपकाळ हे सहा जण वीज चोरी करतांना आढळल्याने या सर्व सहा जणांना त्यांनी चोरी केलेल्या विजेच्या युनिट अनुसार दंडाची रक्कम काढून त्यांना नोटीस देण्यात आली मात्र या सहा जणांनी दंड न भरल्याने या सहा जणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !