नवापूर शहरातील एकाच कुटूंबातील तिघांची रेल्वेखाली आत्महत्या

मयतांमध्ये दाम्पत्यासह वडिलांचा समावेश : दुचाकी घेण्यावरून उफाळलेल्या वादातून घटना


Three members of the same family committed suicide under the train in Nawapur city नवापूर : नवापूर शहरातील तीनटेंबा परीसरातील एकाच कुटूंबातील तिघांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या घटनेने नवापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. सावंत सैय्यद गावीत (23) व पत्नी रोशनी सावंत गावीत (20) आणि वडील सैयद कर्मा गावीत (53) अशी मयतांची नावे आहेत. आत्महत्येचे ठोस कारण कळू शकले नसलेतरी कुटूंबात दुचाकी घेण्याच्या वादातून ही घटना घडल्याचा अंदाज आहे.

आधी दाम्पत्याने व नंतर वडिलांनी केली आत्म्हत्या
रात्री 11 वाजेच्या सुमारास सावंत सैयद गावीत त्याची पत्नी यांनी दोघांनी आत्महत्या केली व त्यानंतर सैय्यद गावीत यांनीदेखील रेल्वेखाली आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उप जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनात पंचनामा करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळं, सहकारी युवराज परदेशी, विकी वाघ करीत आहेत.


कॉपी करू नका.