येवतीतील तरुण गावठी कट्टा व जिवंत काडतूसासह जाळ्यात
A young villager in Yevati is trapped with a knife and a live cartridge बोदवड : बोदवड पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे येवती येथील मूळ रहिवासी व हल्ली चाकणस्थित 22 वर्षीय तरुणाला अटक केली असून त्याच्याकडील गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. ही कारवाई सोमवारी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळालेल्या माहितीवरून करण्यात आली. दीपक दादाराव शेजोळे (22, येवती, ता.बोदवड, ह.मु.नानेकरवाडी, चाकण, पुणे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. संशयित रा.का.हायस्कूलसमोरून कमरेला पिस्टल लावून फिरत असताना यंत्रणेने आरोपीला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्या ताब्यातील पिस्टल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, सहा.निरीक्षक अंकुश जाधव, मुकेश पाटील, भगवान पाटील, निखील नारखेडे, निलेश सिसोदे यांनी केली.
