महाराष्ट्र हादरला : बुलढाण्यानजीक कंटेनर-बसमध्ये भीषण अपघात : नऊ जण ठार


Maharashtra shaken : Fatal accident in container-bus near Buldhana : Nine killed बुलढाणा : भरधाव बस आणि भरधाव कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघात नऊ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र हादरवणारा हा अपघात सिंदखेडराजाजवळ मंगळवारी पहाटे घडला. या अपघातात कंटेनर चालक, बस चालकांसह नऊ प्रवासी ठार झाले तर 13 प्रवासी जखमी झाले आहेत.

कटरच्या सहाय्याने काढला मृतदेह
वाशिमकडे निघालेली एस.टी.बस व कंटेनरमध्ये मंगळवारी सकाळी अपघात घडला. अपघातात ट्रकमधील चालक वाहनात अडकल्याने कटरद्वारे त्याला बाहेर काढण्यात आली. अपघातात बस अर्ध्यापर्यंत कापली गेली. एसटी बस ही भरधाव वेगाने वाशिमच्या दिशेने जात असताना कंटेनर हा सिंदखेडराजाकडे जात होता. यावेळी दोघं वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने एकूण नऊ जणांचा मृत्य झाला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !