विरावली जवळ अवैधरीत्या गोवंश वाहतूक : तिघांविरोधात गुन्हा
यावल : तालुक्यातील विरावली येथील बस स्टड जवळ अनधिकृतपणे गोवंश वाहतूक करतांना एका वाहनाला पकडण्यात आले. या वाहनात अवैधरीत्या तीन गोवंशांची वाहतूक केली जात असल्याने पथकाने गोवंश व वाहन असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
दिड लाखांचा मुद्देमाल जप्त
विरावली, ता.यावल येथील बसस्थानकावर एका मालवाहू वाहनांमध्ये तीन गोवंशाची वाहतूक केली जात असल्याची माहिती यावल पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी वाहन अडवल्यानंतर संबधीतांकडे वाहतुकीचा परवाना नव्हता तेव्हा यावल पोलिसांच्या पथकाने सदर वाहन व त्यातील तीन गोवंश असा एकूण एक लाख 50 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलीस कर्मचारी अनिल रमेश पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात मोईद्यीन इस्माईल कुरेशी (किनगाव), नथू पठाण (आडगाव) व सय्यद शकील सय्यद हमीद (रा. मन्यार वाडा, यावल) या तिघांविरुद्ध प्राणी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहे.
