अकलूदला 28 वर्षीय विवाहितेचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा
Akludala molesting 28-year-old married woman: Crime against one यावल : तालुक्यातील अकलूद येथील 28 वर्षीय विवाहितेचा ती घरी एकटी असतांना जळगाव येथील एकाने येऊन विनयभंग केला. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगावच्या संशयिताविरोधात गुन्हा
अकलूद, ता.यावल येथील 28 वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार, ती घरी एकटीच असताना एस.टी. कॉलनी,जळगाव येथील रहिवासी शशिकांत यशवंत सोनवणे हा घरी आल्यानंतर त्याने विाहितेचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या प्रकरसणी फैजपूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रभाकर चौधरी करीत आहेत.
