मालोदच्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण
यावल : तालुक्यातील मालोद येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवत तिला फुस लावून पळवून नेले. हा प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास येतात या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अपहरण प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा
मालोद, ता.यावल येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घरी असताना अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला कसले तरी आमिष दाखवले व फुस लावून पळवून नेले व तिचे अपहरण केले. हा प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास येताच पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने यावल पोलीस ठाणे गाठत तक्रार दिल्यावरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.
