भुसावळात किरकोळ कारणावरून एकाला मारहाण : चौघांविरोधात गुन्हा


भुसावळ : शहरातील खडका रोड, मुस्लीम कॉलनी भागात किरकोळ कारणावरून एकाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी चौघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
मेहमूद गनी पिंजारी (32, खडका रोड, मुस्लीम कॉलनी, पाण्याच्या टाकीजवळ, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, संशयित आपल्याकडे पाहून हसत असल्याने त्यास त्याबाबत जाब विचारल्यानंतर संशयितांना राग आल्याने त्यांनी शिविगाळ करीत मारहाण केली तसेच डोक्यात व पाठीवर लोखंडी पाईप मारून दुखापत केली. या प्रकरणी पिंजारी यांच्या तक्रारीवरून मुजाहित कदिर पिंजारी, गोलू कदीर शहा, जुबेर व गुल्ला (पूर्ण नाव नाही, सर्व रा.खडका रोड, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक तुषार पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !