भुसावळ बाजार समिती सभापती अनिल वारके बिनविरोध

भाजपाचा समितीवर वरचष्मा : उपसभापतीपदी शिवाजी पाटील


Bhusawal Bazar Committee Chairman Anil Warke unopposed भुसावळ : माजी आमदार संतोष चौधरी व आमदार एकनाथराव खडसे यांना धक्का देत आमदार संजय सावकारे यांनी बाजार समितीवर एकहाती सत्ता मिळवल्यानंतर बुधवारी बाजार समिती सभापती पदासाठी निवडणूक झाली. त्यात ठरल्याप्रमाणे सभापतीपदी भाजप प्रणित पॅनलचे अनिल वारके तर उपसभापतीपदी शिवाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली. साधारण एक वर्षांसाठी ही निवड असणार असून पाच वर्षात पाच सदस्यांना संधी देण्याचे भाजपाचे नियोजन आहे तर उपसभापती पदासाठी एका वर्षात दोघांना संधी मिळू शकते.

चुरशीच्या लढतीत बाजार समिती भाजपाकडे
काही दिवसांपूर्वी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होवून भाजप प्रणित पॅनलने मविआ प्रणित पॅनलचा पराभव करीत 15 जागा पटकावल्या तर तीन जागा अवघ्या मविआला मिळाल्या. निवडणुीकीनंतर सभापती व उपसभापतीपदाबाबत उत्सुकता लागली असताना बुधवारी निवड बिनविरोध झाली.

यांची होती उपस्थिती
बुधवारच्या बैठकीत सभापतीपदासाठी अनिल वारके तर उपसभापदीपदासाठी शिवाजी पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. निवड जाहीर होताच मोठी आतषबाजी करत या निवडीचे स्वागत करण्यात आले. माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक पिंटू ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी नवनियुक्त सभापती आणि उपसभापती यांचे स्वागत केले.


कॉपी करू नका.