गिरडगावच्या तरुणाचा विहिरीत पडल्याने मृत्यू


Girdgaon youth dies after falling into a well यावल : तालुक्यातील गिरडगाव येथील 35 वर्षीय तरुणाचा शेत विहिरीत पडून मृत्यू झाला. हा तरूण शेतातील एका विहिरीजवळ काम करीत होता व तोल जावून तो विहिरीत पडला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भागवत मुरलीधर पाटील (35) असे मयताचे नाव आहे.

तोल जावून पडल्याने मृत्यू
भागवत हा तरुण गावालगत असलेल्या किनगाव येथील नरेंद्र सपकाळे यांच्या शेताच्या विहिरीजवळ काम करीत होता. दरम्यान काम करत असतांना त्याचा तोल गेला व तो विहिरीत पडला. हा प्रकार मजुरांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी नागरीकांना कळवले व तातडीने भागवत पाटील यास विहिरीतून काढून यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात लोकेश पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !