मोठा वाघोदा येथे मध्यरात्री भीषण आग : पाच टपर्‍या जळून खाक


Fierce midnight fire at Big Waghoda : Five tapiras gutted सावदा : येथून जवळच असलेल्या मोठा वाघोदा येथे बस स्थानकाजवळील पाच टपर्‍यांना 23 रोजी मध्यरात्री अचानक आग लागल्याने टपर्‍यांसह त्यातील साहित्य खाक झाल्याने व्यावसायीकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

आगीचे नेमके कारण अस्पष्ट : व्यावसायीकांवर संकट
बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील मोठे वाघोदे येथील बसस्थानकाजवळील पाच टपर्‍यांना बुधवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. विजय नथू चौधरी यांच्या मालकीच्या बासुरी पान सेंटरमधील झेरॉक्स मशीन, लॅपटॉप, स्टेशनरी व इतर साहित्यासह दोन लाखांचे साहित्य जळाले तर गुलशन समशेर पठाण यांचे सुमारे दीड लाख रुपयाचे टपरीसह साहित्य जळून खाक झाले. मलक इमाम मलक सरवर यांच्या सायकल दुकानातील साहित्यासह टपरी मिळून 40 हजारांचे नुकसान झाले. मधुकर भिकाजी निंबाळकर यांची सलून टपरी जळाली तसेच ईलाईस खान ईस्माईल खान यांच्या दुचाकीच्या गॅरेजचे नुकसान झाले. सावदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र आगीचे कारण कळू शकले नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !