dysp krishnat pingale bhusawal 24 तासात फिरवला गृह विभागाने आदेश : भुसावळच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी कृष्णात पिंगळे


The Home Department reversed the order in 24 hours: Krishnat Pingle as the new Deputy Superintendent of Police of Bhusawal भुसावळ : भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची संगमनेर येथे बदली झाल्यानंतर धर्माबाद, जि.नांदेड उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक विक्रांत हिंमत गायकवाड यांची नियुक्ती गृह विभागाने मंगळवारी केली मात्र 24 तासात गृह विभागाने आदेश फिरवत भुसावळसाठी वर्धा पोलीस उपअधीक्षक कृष्णात महादेव पिंगळे (dysp krishnat pingale bhusawal) यांची नियुक्ती केली तर भुसावळसाठी नियुक्त विक्रांत गायकवाड यांची सुधारीत आदेशानुसार जालना उपअधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

आदेश फिरवल्याने अधिकार्‍यांमध्ये खळबळ
24 तासात बदलीचे आदेश फिरवल्याने आल्याने गृह विभागावर टिकेची झोड उठली असून अधिकार्‍यांच्या गोटातही मोठी खळबळ उडाली आहे. अनेक अधिकारी या आदेशाविरोधात मॅटमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !