भुसावळातील अजय भोळे यांच्याकडे भाजपाच्या नंदुरबारसह मालेगाव प्रभारीपदाची जवाबदारी


Ajay Bhole of Bhusawla is in charge of Malegaon along with Nandurbar भुसावळ : शहराचे माजी नगरसेवक तथा भाजपचे प्रदेश सचिव अजय एकनाथ भोळे यांच्याकडे पक्ष नेतृत्वात नंदुरबार जिल्ह्यासह मालेगावच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे. अलीकडेच प्रदेश कार्यकारीणीत अजय भोळे यांना सचिवपदी स्थान मिळाल्यानंतर लेवा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न पक्ष नेतृत्वाने केला होता. यानंतर आता भोळे यांच्याकडे नंदुरबार जिल्ह्यासह मालेगाव येथील पक्ष प्रभारी म्हणून जवाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातील पत्र जारी केले आहे.

अभिनंदनाचा निवडीनंतर अभिनंदनाचा वर्षाव
चंद्रशेखर बावनकुळे यांनी जारी केलेल्या पत्रात त्यांच्यावरील नवीन जबाबदारीची माहिती देण्यात आली असून नवीन नियुक्तीबद्दल अजय भोळे यांच्यावर सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे


कॉपी करू नका.