वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील स्टेट बँक फोडण्याचा प्रयत्न फसला

लॉकर न तुटल्याने मोठी चोरी टळली : अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल


An attempt to break into the state bank in Varangaon Ordnance Factory failed भुसावळ : तालुक्यातील वरणगाव येथील आयुध निर्माणी वसाहतीतील स्टेट बँक शाखेच्या भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सुदैवाने चोरट्यांना लॉकर फोडण्यात यश न आल्याने मोठे आर्थिक नुकसान बँकेचे टळले आहे. विशेष म्हणजे फॅक्टरीत सुरक्षा रक्षकांचा पहारा असताना हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

लॉकर न तुटल्याने मोठी लूट थांबली
वरणगाव फॅक्टरीत राष्ट्रीयकृत स्टेट बँकेची शाखा असून या ठिकाणी बँकेच्या स्टाफने मंगळवार, 23 रात्री आठ वाजता बँक बंद केली मात्र नंतर बुधवारी सकाळी नऊ वाजता बँक उघडताना भिंतीला भगदाड पाडण्यात आल्याचे लक्षात आले तसेच लाकडी दरवाजा तोडून लॉकर तोडण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्याने केल्याचे दिसून आले. चोरट्याकडून लॉकर न तुटल्याने सुदैवाने बँकेतील रोख रक्कम व इतर साहित्य बचावले. बँक मॅनेजर सचिन वानखेडे यांना ही बाब कळवण्यात आली. या प्रकरणी मनीष रामअवतार शर्मा (36, टाईप थ्री, 37 नंबर) यांनी वरणगाव पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधिकार्‍यांची धाव
सहाय्यक निरीक्षक आशिशकुमार अडसुळ, उपनिरिक्षक परशुराम दळवी, नागेंद्र तायडे, विजय बाविस्कर, प्रमोद कंखरे यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. चोरी करण्याच्या प्रयत्नातील भामटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक ईस्माईल शेख करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !