वीज चोरी प्रकरणी चिखलीच्या दोघांवर कारवाई
यावल : मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली येथे वीज वितरण कंपनीच्या वतीने मुक्ताईनगर ग्रामीण कक्षाच्या मार्फत विविध चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. यामध्ये चिखली गावात दोघे वीज चोरी करतांना आढळल्यानंतर त्यांना दंडाची नोटीस देण्यात आली मात्र त्यांनी दंड न भरल्याने दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
वीज चोरी प्रकरणी गुन्हा
चिखली, ता.मुक्ताईनगर या गावात ग्रामीण कक्षाचे अभियंता अजय मुनाफ तडवी यांनी पथकासह वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवली. या मोहिमेत त्यांना गुलाब वसंत खोंडले व राजू सुपडू कचरे हे वीज चोरी करतांना आढळले. या दोघांना वीज चोरी केल्या संदर्भात दंडाची नोटीस देण्यात आली मात्र दोघांनी दंड न भरल्याने त्यांच्याविरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार योगेश खडके करीत आहेत.
