बामणोद येथील दाम्पत्यास मारहाण : चार जणांविरोधात गुन्हा


Beating of a couple in Bamanod: Crime against four persons फैजपूर : येथून जवळच असलेल्या बामणोद येथे काही एक कारण नसताना दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा
ज्योतीबाई काशीनाथ सोनवणे (34, इंदिरानगर, बामणोद) यांच्या तक्रारीनुसार, रविवार, 21 रोजी रात्री नऊ वाजता संशयितांनी काही एक कारण नसताना त्यांच्यासह पती काशीनाथ सोनवणे यांना शिविगाळ करीत मारहाण केली तसेच भांडणात महिलेची सोन्याची पोत तुटून नुकसान झाले. या प्रकरणी सुसाबाई वसंत सोनवणे, प्रतिभा सुभाष सोनवणे, रेखाबाई दुर्योधन कोळी, बबलू वसंत सोनवणे, दुर्योधन रघुनाथ कोळी, ललिताबाई कोळी (सर्व बामणोद, ता.यावल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फैजपूरचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास हवालदार गोकुळ बुधा तायडे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !