वादळी पाऊस : रावेर तालुक्यात केळी बागांचे दहा कोटींचे नुकसान


Torrential rains: Damage to banana orchards in Raver taluka worth Rs 10 crores रावेर : रावेर शहरासह तालुक्यात रविवारी मध्यरात्री झालेल्या वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने अंदाजे 10 कोटी रुपयांचे केळी बागांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. वादळी पावसाचा तालुक्यातील 15 गावांना फटका बसला असून नुकसानग्रस्त भागात ठिकठिकाणी वादळामुळे झाडे उन्मळून पडली तर रात्री काही भागात वीजपुरवठा खंडित झाला.

15 गावांना वादळाचा फटका
रविवारी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह पाऊस झाला. या पावसाचा फटका तालुक्यातील 15 गावातील 230 शेतकर्‍यांच्या 241.76 हेक्टर एवढ्या शेत-शिवाराला बसला.. या वादळाच्या तडाख्याने कापणीला आलेल्या केळी बागांचे नुकसान झाले असून खोडे मोडून पडली आहेत. सुमारे नऊ कोटी 67 लाख चार हजार रुपयांच्या नुकसानीचा अंदाज तालुका कृषी अधिकारी मयूर भामरे यांनी वर्तवला.

बाधीत गावे, शेतकरी संख्या व कंसात बाधीत क्षेत्र
चोरवड 30 (20), अजनाड 28 (18), खिरवड 15(12), अभोडा बुद्रूक 10 (12), जिनसी 6 (5), लालमाती 2 (3), गुलाबवाडी 6 (5), विवरे खुर्द 15 (18), वडगाव 7 (8 ), रावेर 5 (3), खिरोदा प्र. रावेर 1 (0.76), खिरोदा प्र. यावल 18 (14) कळमोदा 40 (56), चिनावल 35 (49 ), जानोरी 12 (18)

तत्काळ पंचनामे सुरू
नुकसानग्रस्त केळी बागांचे नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागातर्फे सोमवारपासून सुरू करण्यात आले आहेत. अंदाजे 10 कोटींच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. नुकसानीचा अंतीम अहवाल तयार झाल्यावर तो वरीष्ठांना पाठविण्यात येईल, असे तहसीलदार बंडू कापसे म्हणाले.


कॉपी करू नका.