भुसावळात गांजा ओढणार्‍यांची पोलिसांनी उतरवली झिंग : आठ संशयितांना अटक

आठ जणांविरोधात गुन्हे : कारवाईने नशेखोरांमध्ये उडाली खळबळ


Police busted ganja smokers in Bhusawal : Eight suspects arrested भुसावळ : नशेच्या आहारी जावून अनेकदा गुन्हे होत असल्याने या गुन्ह्यांना पायबंद लागण्यासाठी शहरातील विविध भागात एकाचवेळी पोलिसांनी धडक कारवाई करीत आठ नशेखोरांना कायद्याचा बडगा दाखवत त्यांची झिंग उतरवली. आठ संशयितांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने नशेखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. नूतन पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या सूचनेनुसार बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

शहरात कारवाईने उडाली खळबळ
जंक्शन स्थानक असल्याने अनेक गुन्हेगारांचा डेरा शहरातील विविध भागात जमतो त्यातच नशेच्या आहारी गेलेले गुन्हेगार चिलीमद्वारे गांजा फुकल्यानंतर गुन्ह्यांकडे वळत असल्याने या प्रकारांना पायबंद लागण्यासाठी बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी दिवसभरात आठ संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. नूतन डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक निरीक्षक सुदर्शन वाघमारे, सहायक निरीक्षक मंगेश गोंटला, सहायक फौजदार सत्तार शेख, हवालदार विजय नरेकर, सुनिल जोशी, निलेश चौधरी, उमकांत पाटील, महेश चौधरी, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार, सचिन पोळ, अतुल कुमावत, सचिन चौधरी, हेमंत जागडे यांच्या पथकाने कारवाई केली.

शहरातील ‘या’ संशयितांची उतरली झिंग
अन्सार अहमद शेख उस्मान (28, जाम मोहल्ला, मशीदीजवळ), अशोक डेमा सपकाळे (46, रा.दिनद्याल नगर), यादव भिका खंडारे (48, रा.इंदीरा नगर), राजेश देविदास बिर्‍हाडे (45, महात्मा फुले नगर), विजय पुंजाजी कांडेलकर (40, मोतीराम नगर, शिरपूर कन्हाळा रोड, भुसावळ) मोहन देविदास सोनवणे (41, गोजोरा, ता.भुसावळ), शाहीद असलम गवळी (21, रा.जाम मोहल्ला, मशिदीजवळ), राम बाबू मेश्राम (रा.पंचशील नगर, भुसावळ) यांच्याविरोधात एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार स्वतंत्रव् गुन्हा दाखल करण्यात आला.

नशेखोरांसह विक्रेत्यांबाबत माहिती देण्याचे आवाहन
गुंगीकारक नशेचे पदार्थ वा गांजा बेकायदेशीरपणे बाळगून त्याचे सेवन करणारे नागरीक दिसल्यानंतर त्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना (222399) वर द्यावी अथवा बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक गायकवाड व डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी केले आहे.


कॉपी करू नका.