दोन मागण्यांच्या मंजुरीनंतर प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन स्थगित


भुसावळ : दीपनगर प्रकल्प बाधीतांच्या पाल्यांना 660 मेगावॅट प्रकल्पात सेवेत समावून घ्यावे आदींसह विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी पूर्नवसन समितीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मंगळवारच्या बैठकीत महानिर्मितीने दोन मागण्यांवर सहमती दर्शवली तर अन्य मागण्यांवर मुखालय पातळीवरुन निर्णय होण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन तसेच रास्तारोको आंदोलन तूर्त मागे घेतले.

या मागण्यांसाठी आंदोलन
महावितरण व महापारेषण कंपनीत विशेष आरक्षण ठेवून सरळसेवा भरतीव्दारे प्रकल्पग्रस्तांना समावून घ्यावे, एक बाय 660 मेगावॅट रेल्वे लाईनसाठी वाटाघाटीने जमीन संपादीत करण्यात आलेली होती. यात एमसीए, डिप्लोमा सह 13 पदवी व पदविका धारकांना विशेष बाब मान्यता देवून प्रशिक्षणार्थी म्हणून घेण्यात आले आहे. त्यांना कराराप्रमाणे परीक्षा न घेता सरळ नोकरीत समाविष्ठ करावे आदी विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी पूर्नवसन समितीने 1 जूनपासून बेमुदत आंदोलन छेडले. या आंदोलनाचा भाग म्हणून बुधवारी प्रकल्पग्रस्त आंदोलक शेतकर्‍यांनी 660 मेगावॅट प्रकल्पाच्या रेल्वे सायडींगचे काम थांबविणे व महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता मात्र प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांची प्रशासनासोबत बैठक होऊन त्यात दोन मुख्य विषय मार्गी लागले. मुख्य अभियंता मोहन आव्हाड, मुख्य अभियंता विवेक रोकडे यांनी याबाबत आश्वासन दिल्याने तूर्त आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. आगामी काळात मुख्यालयातून काही मागण्यांवर चर्चा होणार आहे. या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा समिती अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, समिती सचिव सुभाष झांबरे व सर्व प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी दिला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !