20 टक्के अनुदानाचा लाभ ‘त्या’ शिक्षकांना का नाही? : प्र.ह.दलाल


भुसावळ : दीर्घ कालावधीनंतर राज्य शासनाने नैसर्गिक वाढीव तुकड्यांना 20 टक्के अनुदान मंजूर केल्यानंतर सुमारे दहा वर्षांपासून पगाराविना राबणार्‍या हजारो शिक्षकांच्या चेहर्‍यावर हास्य उमटले मात्र या अनुदानासाठी शालार्थ आयडीसाठी शाळांकडून प्रस्ताव मागवताना टीईटी पास मात्र अपात्र घोषित केलेल्या शिक्षकांना अनुदानासाठी अपात्र घोषित करीत त्यांचे शालार्थ आयडी सुरू करण्याचे नाकारले.

तर न्यायालयात जाण्याची तयारी
वास्तविक अशा हजारो शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने न्यायालयाने स्टे दिल्यानंतर त्यांचे पगार न थांबविण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना या शिक्षकांना ह्या अनुदानापासून वंचित ठेवण्याचे संयुक्तिक कारण नाही. दीर्घ कालावधीपासून थोडा तरी पगार मिळेल या आशेवर जगणार्‍या हजारो शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसली गेली. शासनाने सहानुभूती पूर्वक विचार करून या शिक्षकांना न्याय द्यावा त्यांना पुन्हा पोटासाठी न्यायालयात धाव घ्यायची वेळ आणू नये, असे ज्येष्ठ शिक्षक नेते प्र.ह.दलाल यांनी शासनाला आवाहन केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !