शाहु नगरातील मिस्तरी काम करणार्‍या तरुणाचा वीज धक्क्याने मृत्यू


Death of a young bricklayer in Shahu Nagar due to electric shock जळगाव : मिस्तरी काम करून कुटूंबाला मदत करणार्‍या तरुणाचा काम सुरू असताना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. ही घटना कालिका माता मंदिर परीसरात बुधवार, 21 मे रोजी दुपारी एक वाजता घडली. शेख समीर शेख राज मोहम्मद (22, इंदिरा नगर, शाहू नगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

विजेचा धक्का बसताच तरुणाचा मृत्यू
मिस्तरी काम करणारा शेख समीर हा आपल्या आई व लहान भावासोबत शाहू नगरातील इंदिरा नगरात वास्तव्याला होता. खेडी शिवारातील कालिका माता मंदिर परीसरात बांधकामाचे काम सुरू असताना बुधवार, 21 मे रोजी दुपारी एक वाजता बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या बोरींगच्या वायरचा स्पर्श झाल्याने शेख समीर याला जोरदार विजेचा धक्का बसताच त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरीक व बांधकाम करणार्‍या कामगारांनी धाव घेत वीजपुरवठा बंद करून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !