चारचाकीने उडवल्याने खिरोद्यातील महिलेचा मृत्यू
A woman in Khiroda died after being run over by a four-wheeler रावेर : बर्हाणपूर ते अंकलेश्वर महामार्गावर चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील 40 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी घडला.
पाठीमागून धडक बसताच मृत्यू


शेख शरीफ हे त्यांच्या पत्नी मरीयमबी शेख शरीफ (40, रा.खिरोदा प्र.यावल) यांच्यासह दुचाकी (एम.एच.17- 1609) ने बर्हाणपूरकडे जात असताना रावेरनजीक पंजाबशहा बाबाजवळ पाठीमागून भरधाव वेगाने येणार्या बोलेरो (यु.पी.12 बी.एफ.5844) ने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील मरीयम शेख यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अपघाताची माहिती कळताच मुस्लिम पंच कमेटी सदस्य गयास शेख गयासुद्दीन काझी, अब्दुल रफिक शेख़ सादिक मेंबर यांनी ग्रामीण रुग्णालय गाठत मदत केली.