जामनेरच्या बेपत्ता प्रौढाचा अखेर उसनवारीच्या पैशातून खून


Jamner’s missing adult finally killed with Usanwari’s money जामनेर : जामनेर तालुक्यातील जांभूळ येथील 45 वर्षीय प्रौढ इसम महिनाभरापासून बेपत्ता असतानाच त्यांचा शोध सुरू असतानाच जळगाव गुन्हे शाखेने एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर उसनवारीच्या पैशातून संशयिताने प्रौढाचा खून केल्याची कबुली दिल्याने जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. कैलास विठोबा वडाळे (45, रा.जांभूळ ता. जामनेर) असे खून झालेल्या प्रौढाचे नाव आहे तर संशयित आरोपी रमेश मोरे (वडाळी, ता.जामनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

महिनाभरापासून प्रौढ बेपत्ता
सूत्रांच्या माहितीनुसार, 13 मे 2023 रोजी दुपारी तीन वाजेनंतर (वेळ निश्चित नाही) संशयित रमेश मोरे (रा.वडाळी ता. जामनेर) याने कैलास वडाळे यांच्याकडे उसनवारीचे पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन कशानेतरी घातपात करुन मारुन खून केल्याचा आरोप मयताचा मुलगा अविनाश कैलास वडाळे याने केल्यानंतर जामनेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. जामनेर पोलिसांनी रमेश मोरे याला अटक केली आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !