जामनेर तालुक्यातील युवकाची शेलवड शिवारात आत्महत्या
Jamner taluka youth commits suicide in Shelvad Shivar बोदवड : बोदवड तालुक्यातील शेलवड शिवारातील एका युवकाने गळफास घेेत आत्महत्या केली. मोतीलाल भीमराव सपकाळे (34, रा.नवीदाभाडी, ता.जामनेर) असे मयत युवकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
नैराश्यातून आत्महत्येचा संशय
बोदवड तालुक्यातील सीताराम भावडू धनगर यांच्या शेताच्या बांधावरील चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने मोतीलाल भीमराव सपकाळे (34, रा.नवीदाभाडी, ता.जामनेर) याने बुधवारी दुपारी तीनवाजेच्या सुमारास नैराश्यातून गळफास घेतला. याप प्रकरणी नामदेव नथु सपकाळे यांच्या खबरीवरून बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस कॉन्स्टेबल विलास महाजन करीत आहे.

