जामनेर तालुक्यात ट्रक व कारमध्ये अपघात : कार चालक ठार


Truck and car accident in Jamner taluk: Car driver killed जामनेर : भरधाव इंडिका कार व ट्रकमध्ये झालेल्या धडकेत कार चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात जामनेर तालुक्यातील स्टार फॅक्टरीपासून काही अंतरावरील वाडी गावानजीक गुरूवारी दुपारी एक वाजता घडला. या अपघातात मनोज बळीराम वाघ (लिहा, ता.मोताळा) यांचा मृत्यू झाला.

पत्रा कापून काढला कार चालकाचा मृतदेह
जामनेर तालुक्यातील स्टार फॅक्टरीपासून जवळ असलेल्या वाडी गावानजीक भरधाव वेगाने येणारी कार आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. हा अपघात गुरूवारी दुपारी एक वाजता झाला. या भीषण अपघातात ट्रकने कारला फरफटत नेल्याने कार चालक मनोज बळीराम वाघ (लिहा, ता.मोताळा) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाल. अपघात इतका भीषण होता की, कारचा पत्रा कापून चालकाचा मृतदेह बाहेर काढावा लागला. अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली. अपघाताची माहिती मिळताच जामनेर व बोदवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !