जळगावातील जलतरण तलावात तरुणाचा मृत्यू : व्यवस्थापकासह चौघांविरोधात गुन्हा


Youth’s death in Jalgaon swimming pool: Case against four including manager जळगाव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावात सलमान शेख शकील बागवान (22, रा.बागवान मोहल्ला) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी गुरुवारी दुपारी तीन वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात जलतरण व्यवस्थापकासह इतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे तरुणाच्या मृत्यूचे प्रकरण
जळगाव शहरातील जोशी पेठेतील बागवान मोहल्ल्यातील सलमान शेख शकील बागवान हा तरुण त्याचे मित्र फैजल जावेद बागवान, अझर अकबर बागवान, शेख हुजेफा शेख आतिक, फरान शाहीद बागवान यांच्यासोबत रविवार, 18 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेले असता तलावात सुमारे 55 ते 60 मुले पोहण्यासाठी उतरलेली होती. यावेळी जनरल बॅच असल्याने या ठिकाणी एकही कोच उपस्थित नव्हता. याचवेळी सलमान शेख शकील बागवान हा तरुण पाण्यात उतरल्यानंतर बुडाला. तरुणाच्या मित्रांनी ही बाब ठेकेदार राहुल सूर्यवंशी याला सांगितल्यानंतर कर्मचारी पाण्यात उतरल्यानंतर तळाशी असलेल्या सलमान शेख शकील बागवान याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले मात्र तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

यांच्याविरोधात गुन्हा
या प्रकरणी अखेर फैजल जावेद बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जलतरण तलावाचे व्यवस्थापक राहुल विजय सुर्यवंशी, जीवरक्षक सुनील चौधरी, यादव महाले आणि पंकज पवार यांच्याविरोधात जळगाव जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !