यावल बसस्थानकात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची सोन्याची अंगठी लांबवली
Yawal handed over the old man’s gold ring saying that there was a policeman at the bus stand यावल : यावल बस स्थानकाच्या आवारामध्ये एका 72 वर्षीय सेवानिवृत्त कर्मचार्याला पोलीस असल्याची बतावणी करून अंमली पदार्थ संदर्भात तुमची झडती घ्यायची आहे, असे सांगून झडती घेवून अज्ञात भामट्यांनी वृद्धाकडील सोन्याची अंगठी घेत पळ काढला. वृद्धाने फसवणूक झा
ल्याचे लक्षात येताच तातडीने यावल पोलीस स्टेशन गाठले व दोन अज्ञात भामट्यांविरूध्द यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
तोतया पोलिसांचा सीसीटीव्हीद्वारे शोध
यावल येथील बस स्थानक आवारात प्रकाश जगन्नाथ सांगवीकर (72) हे सेवानिवृत्त एस.टी.कर्मचारी कामानिमित्त आले असता आवारातच त्यांना दुचाकीवर दोन भामट्यांनी थांबवले आणि त्यांना सांगितले की आम्ही पोलीस आहोत व अंमली पदार्थ तस्करी संदर्भात तपासणी करीत आहोत. आम्हाला तुमची झडती घ्यायची आहे, असे सांगून त्यांनी वृद्धाला खिशातील रुमाल काढायला लावला आणि त्या रुमालावर त्यांची झडती घेत खिशातील साहित्य ठेवले व त्यातील एकाने वृध्दाच्या हातातील सोन्याची अंगठी देखील काढली ती रुमालात ठेवण्याचा बनाव केला व रुमालात साहित्य बांधून वृध्दाला परत दिले व तपासणी झाल्याचे सांगून ते दुचाकीव्दारे निघून गेले. वृध्दाने रूमाल उघडून पाहिला असता त्यात सर्व साहित्य होते मात्र सोन्याची अंगठी नव्हती. वृद्धाने थेट पोलीस ठाणे गाठले व यावल पोलीस ठाण्यात दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध तक्रार नोंदवली.



