भुसावळातील दारुल उलूम रजबिया नुरीया मदरशामध्ये वृक्षारोपण


भुसावळ ; शहरातील खडका रोडवरील दारुल उलूम रजबिया नुरीया मदरशामध्ये पर्यावरण जागर प्रतिष्ठान ‘हरीत भुसावळ स्वच्छ भुसावळ’ सदस्यांच्या वतीने 15 वृक्ष लावण्यात आली.

यांची कार्यक्रमप्रसंगी उपस्थिती
भुसावळ नगरपरीषदेचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसेडर नाना पाटील यांनी वृक्ष उपलब्ध करून दिल्यानंतर त्याचे मान्यवरांच्या उपस्थितीत रोपण करण्यात आले. या वृक्षाचे संवर्धन मदरश्यामधील प्रत्येक विद्यार्थ्याकडून केले जाईल, असे मदरश्याचे प्रमुख मौलाना कमुदीन म्हणाले. लवकरच 40 वृक्ष लावले जाणार असून त्यांची जबाबदारी विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. या मदरश्यामध्ये पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे व हरित भुसावळ व स्वच्छ भुसावळचे सदस्य राधेश्याम लाहोटी, पत्रकार संजयसिंग चव्हाण, नाना पाटील, पत्रकार इम्तियाज, पत्रकार इकबाल, सुरेंद्रसिंग पाटील, आपुसोफिया नंद अन्सारी, नुरल हसन अन्सारी, मौलाना तौसीफ रजा, मौलाना फैजान रजा, नूरगणी हसन आदींची उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !