शेती कसण्याच्या कारणावरून सावखेडासीम गावातील 55 वर्षीय शेतकर्‍याला एकाची मारहाण


A 55-year-old farmer of Savkhedasim village was beaten up by one of them due to the reason of cultivation यावल : तालुक्यातील सावखेडासीम या गावातील 55 वर्षीय शेतकर्‍याला एकाने शेत कसण्याच्या कारणावरून मारहाण केली व थेट कुर्‍हाड मारून दुखापत केली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

किरकोळ वादातून केली मारहाण
सावखेडासीम, ता.यावल येथील शेतकरी प्रकाश देवराम पाटील (55) यांचे सावखेडासीम या गावातील नायगाव रोडवर शेत आहे. शेताच्या समोर त्यांचे खळे आहे. या खळ्यात शेतकरी असतांना तेथे भागवत रामदास पाटील (सावखेडासीम) हे आले व काकाचे शेत पूर्वी ते कसायचे या कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यांनी शिवीगाळ करून त्यांना मारहाण करीत हातातील कुर्‍हाडीने ओठावर मारून दुखापत केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भागवत पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !