तारण शेतीची परस्पर विक्री : टाकरखेडा येथील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल


Mutual sale of mortgage farm : Case registered against six persons from Takarkheda यावल : यावल तालुक्यातील टाकरखेडा येथील शेती फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवली होती व फायनान्स कंपनीकडून कुठलीच संमती न घेता व तारण गहाण जमिनीवरील कर्जाची परतफेड न करता शेत जमिनीपैकी एक हेक्टर 55 आर.शेतीची विक्री करीत फसवणूक करण्यात आली. यावल न्यायालयाच्या आदेशान्वये सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सहा संशयितांविरोधात गुन्हा
टाकरखेडा, ता.यावल येथील शेतकरी एकनाथ दगडू कंखरे यांनी जळगाव येथील कमर्शियल फायनान्स कंपनीकडून शेतीवर कर्ज घेतले होते. त्यांच्याकडे दोन लाख 39 हजार रुपये थकीत आहे. असे असतांना त्यांनी आपल्या शेतजमिनीपैकी एक हेक्टर 55 आर क्षेत्र हे परस्पर विक्री केले. फायनान्स कंपनीची परवानगी न घेता त्याचा व्यवहार केला. कर्ज थकीत असतांना देखील परस्पर जमीन विक्री करून फसवणूक केल्याने एकनाथ कंखरे, हंसराज महाजन, संतोष रतन चौधरी (टाकरखेडा), राजेश कोलते, स्वाती चौधरी, राजू धनगर या सहा जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशान्वये यावल पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !