नशिराबादला दुचाकी अपघातात दाम्पत्याचा मृत्यू ; आयशर चालकाविरोधात गुन्हा
A couple died in a two-wheeler accident in Nashirabad; Crime against Eicher driver जळगाव : जामनेर तालुक्यातील सामरोदच्या दाम्पत्याचा दुचाकी अपघातात नशिराबाद येथे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी 10.30 वाजता घडली होती. या प्रकरणी आयशर चालक सलमान मेहबूब (235, ढकोली पी.एस.आकोद, जि.बुलंदशहर) याच्याविरोधात नशिराबाद पोलिसात दशरथ शंकर कोळी (48, नागनचौकी, ता.जामनेर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे अपघात प्रकरण
सामरोद, ता.जामनेर येथील दीपक बाबुराव कोळी (27) व त्यांची पत्नी शीतल दीपक कोळी (21, सामरोद, ता.जामनेर) हे दुचाकीवरून शुक्रवारी असोदा येथे भाच्याला पाहण्यासाठी आल्यानंतर परतीच्या प्रवासात गावाकडे दुचाकी (एम.एच.19 ए.ए.2095) ने नशिराबादमार्गे जळगावकडून जामनेरकडे जात असतांना नशिराबाद उड्डाणपुलावर आयशर (एच.आर.74 बी.4242) ने स्त्याच्या परीस्थितीकडे दुर्लक्ष करीत धडक दिल्याने दाम्पत्याचा मृत्यू ओढवला. अपघात प्रकरणी आयशर चालक सलमान मेहबुब याच्याविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नूर खान करीत आहे.

