कुर्‍हाकाकोडानजीक टायर फुटल्याने भरधाव ट्रक झाडावर धडकला : सुदैवाने प्राणहानी टळली


A speeding truck crashes into a tree after bursting a tire near Kurhakakoda : fortunately Loss of life was avoided कुर्‍हा : मुक्ताईनगरकडून कुर्‍हाकडे निघालेल्या ट्रकचे अचानक टायर फुटल्याने ट्रक झाडावर आदळला. हा अपघात कुर्‍हा येथील एस.आर.पेट्रोल पंपासमोर घडला. जळगावहून जोंधनखेडा धरणावर सिमेंट घेवून निघालेल्या ट्रक (एम.एच.19 झेड.3913) चे शनिवार, 24 रोजी दुपारी साडेचार वाजता क्लिनर साईडने टायर फुटल्याने ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या एक बाभुळच्या झाडावर आदळला.

सुदैवाने टळली प्राणहानी
या अपघातात ट्रक चालक विजय पुरोहित (50, जळगाव) व क्लिनर साबीर पिंजारी (40, जळगाव) बचावले आहेत. पाच वाजेपूर्वी अपघात घडल्याने मोठा अनर्थ टळला. सायंकाळी पाच वाजता स्व.अशोक फडके विद्यालय व छत्रपती शिवाजी हायस्कूल सुटल्यानंतर दोन्ही शाळेतील पाचशे ते सहाशे विद्यार्थी रस्त्यावरून चालतात मात्र तत्पूर्वीच अपघात घडल्याने मोठी अप्रिय घटना टळली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !