केळी घड कापणार्या चोरट्याने अहिरवाडीतील केळी उत्पादकाला लूटले
A banana farmer in Ahirwadi was robbed by a thief who was cutting a bunch of bananas रावेर : रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील केळी उत्पादक शेतकर्याच्या मानेला केळी कापण्याची बख्खी लावून चोरट्याने दोनशे रुपयांची रोकड हिसकावून केळी घडासह पलायन केले. ही घटना शुक्रवार, 23 रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. या प्रकरणी संशयित उमेश कुसा वाकसे (अहिरवाडी, ता.रावेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.

लूट प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा
एकनाथ पांडुंरग धनगर (49, अहिरवाडी, ता.रावेर) या शेतकर्याच्या तक्रारीनुसार, त्यांच्या केळीच्या शेतात संशयित उमेश वाकसे हा शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता केळी घड कापत असताना शेतकर्याने पाहिल्यानंतर त्यास हटकताच संशयिताने केळी कापण्याची धारदार बख्खी ेशेतकर्याच्या मानेवर लावत जीवे मारण्याची धमकी दिली तसेच खिशातील दोनशे रुपयांची रोकड व केळी घड घेवून दुचाकीवरून पळ काढला. शेतकर्याने रावेर पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल होताच त्यास अटक करण्यात आली. तपास उपनिरीक्षक दीपाली पाटील करीत आहेत.