Dhoom style Mangalsutra of married couple performing Shatapavali in Bhusawal city भुसावळ शहरात शतपावली करणार्या विवाहितेचे धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवले
Dhoom style Mangalsutra of married couple performing Shatapavali in Bhusawal city भुसावळ : पतीसोबत शतपावली करणार्या विवाहितेच्या गळ्यातील दहा हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र धूम स्टाईल आलेल्या चोरट्यांनी लांबवल्याची घटना शहरातील नाहाटा महाविद्यालयाजवळील एम.जे.पार्किंगसमोरील सर्व्हिस रोडवर शुक्रवारी रात्री 9.40 वाजेच्या सुमारास घडली. विवाहितेने आरडा-ओरड केली मात्र अवघ्या काही क्षणात चोरटे धूम स्टाईल जळगावच्या दिशेने पसार झाले. धूम स्टाईल चोर्या सुरू झाल्याने महिलावर्गात भीती पसरली आहे.
सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांचा कसून शोध
ज्योत्स्ना सतीश नेहते (43, श्रीराम हौसिंग सोसायटी, भुसावळ) या पती सतीश नेहते यांच्यासोबत शुक्रवारी रात्री जेवणानंतर शतपावली करीत असताना अचानक पाठीमागून धूम स्टाईल आलेल्या चोरट्यांनी काही कळण्याआत विवाहितेच्या गळ्यातील अडीच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र लांबवले. बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व कर्मचार्यांनी घटनास्थळ पाहणी केली. पोलिसांनी परीसरातील सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तपास हवालदार सुनील बारकू जोशी करीत आहेत.

