Under the name of special checking in Bhusawal भुसावळात स्पेशल चेकींगच्या नावाखाली भामट्याने वयोवृद्धाची सोन्याची अंगठी लांबवली


Under the name of special checking in Bhusawal, Bhamtya handed over the old man’s gold ring भुसावळ : स्पेशल चेकींग करणारा असल्याचे भासवत रस्त्याने पायी चालणार्‍या वृद्धाकडील 25 हजार रुपये किंमतीची अंगठी भामट्याने लांबवल्याची घटना जामनेर रोडवरील साईजीवन सुपर शॉपीमागे शुक्रवारी सकाळी पावणेदहा वाजता घडली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, यापूर्वीदेखील महिलेला जामनेर रोडवर लूटण्यात आल्याची घटना घडली होती तर यावल बसस्थानकात देखील तपासणीच्या नावाखाली वयोवृद्धाला लूटण्यात आल्याने एकच टोळी असल्याचा संशय आहे.

बोलण्यात गुंतवून लांबवली अंगठी
विजय लक्ष्मण चौधरी (77, मुन्सीपल स्टाफ कॉलनी, भुसावळ) हे सेवानिवृत्त कर्मचारी असून शुक्रवारी सकाळी 9.45 वाजता ते जामनेर रोडवरील साईजीवन सुपर शॉपीमागून जात असताना अंगात पांढरा शर्ट व निळी जीन्स व डोक्यावर टोपी परीधान केलेल्या 38 वर्षीय अनोळखीने त्यांना अडवत स्पेशल चेकींग करणारा असल्याचे भासवून त्यांची झडती घेतली. यावेळी खिशातील मोबाईल, रूमाल व हातातील पाच ग्रॅम वजनाची व 25 हजार रुपये किंमतीची अंगठीही काढली व बोलण्यात गुंतवूक अन्य साहित्य परत केले मात्र अंगठी घेवून संशयित पसार झाला. काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शनिवारी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या परीसरातील सीसीटीव्हीद्वारे संशयिताचे वर्णन मिळवत त्याचा शोध सुरू केला आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश प्रल्हाद चौधरी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !