Big action of Yaval police: 17 cows slaughtered in east यावल पोलिसांची मोठी कारवाई : कत्तलीपूर्वीच 17 गोवंशाची सुटका


Big action of Yaval police: 17 cows slaughtered in east यावल : शहरातील चोपडा रस्त्यावर एका पत्री शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आलेले 16 व खिर्णीपुरा भागातून एक अशा एकूण 17 गोवंशाची पोलिसांनी सुटका केली. कत्तलीच्या उद्देशाने ठेवलेल्या या गोवंश संदर्भात चार जणांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली.

यावल पोलिसांच्या कारवाईने उडाली खळबळ
यावल शहरातील चोपडा रस्त्यावर ख्वाजा मशीद आहे. या मशिदीच्या मागे असलेल्या एका पत्री शेडमध्ये अवैधरीत्या कत्तलीच्या उद्देशाने गोवंश बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश देताच पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, युनूस तडवी, हवालदार सिकंदर तडवी, वसीम तडवी, अलाउद्दीन तडवी, असलम खान, सुशील घुगे, शामकांत धनगर, अनिल साळुंके, पंकज फिरके, अरुण काळे या पथकाने त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली. 16 गोवंश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तसेच खिर्णीपुरा भागातून देखील एका ठिकाणी कारवाई करीत एका गोवंशला ताब्यात घेतले. हे सर्व गोवंश पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
या कारवाई दरम्यान पोलीस ठाण्यासह परीसरात मोठी गर्दी झाली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार असलम खान व हवालदार सुशील घुगे यांच्या फिर्यादी वरून जाकीर खान, उस्मान खान, शकील खान व अताउल्ला अब्दुल खान या चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !