अट्रावल शेत शिवारातून 62 हजार रुपये किंमतीचे विद्युत तार चोरी
Electric wire worth 62 thousand rupees stolen from Atraval Shet Shivaratoon यावल : तालुक्यातील अट्रावल येथील शेत शिवारातून अज्ञात चोरट्याने 11 विद्युत खांबावरील तब्बल एक हजार 980 मीटर लांबीच्या विद्युत तार लंपास केले तसेच काही खांब तोडून टाकत नुकसान केले. हा प्रकार रविवारी सकाळी निदर्शनास आला. विद्युत तारांची किंमत 62 हजार रुपये असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

खंडित वीजपुरवठ्याने हंगामात शेतकर्यांचे हाल
अट्रावल, ता.यावल येथील शेत शिवारात हेमंत एकनाथ चौधरी यांच्या शेतातील रोहित तपासून शालिक महाजन यांच्या शेतापर्यंत विद्युत वितरणचे 11 खांब आहेत. या खांबावर एक जार 980 मीटर विद्युत तार होती. ही विद्युत तार मध्यरात्री नंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली. 62 हजार रुपये किंमतीचे विद्युत तार चोरी केल्या प्रकरणी तसेच काही खांब पाडून तीन हजारांचे नुकसान करण्यात केल्याने यावल पोलीस ठाण्यात प्रधान तंत्रज्ञ हरीश निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.