फैजपूर शहरातील मंगल कार्यालयाजवळून दुचाकी लांबवली


The bike was parked near Mangal office in Faizpur City यावल : फैजपूर शहरातील यावल रोडार असलेल्या एच.पी.पेट्रोल पंपाजवळील सुमंगल लॉनसमोरून दुचाकी चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरट्यांनी जिल्ह्यात टोळी सक्रिय
फैजपूर शहरात यावल रोडवर एचपी पेट्रोल पंप असून त्याच्या बाजूला सुमंगल लॉन आहे. या लॉनच्या बाहेर रवींद्र त्र्यंबक गलवाडे (भवानी पेठ, न्हावी दरवाजा, फैजपूर)यांनी आपली दुचाकी (एम.एच.19 डी.ई.3660) ही लावली असता अज्ञात चोरट्याने ही संधी साधली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रशीद तडवी करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !