यावल शहरात वीज कंपनी कार्यालयासमोरून दुचाकी लंपास
A two-wheeler passes in front of the power company office in Yaval city यावल : शहरातील चोपडा रोडवर असलेल्या साईबाबा गॅरेज जवळील विद्यूत वितरण कार्यालयासमोरून अज्ञात चोरट्याने मोटरसायकल लांबवली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल पोलिसात गुन्हा दाखल
यावल शहरात चोपडा रस्त्यावर साईबाबा मोटर गॅरेज असून त्याच्या बाजूला विद्युत वितरण कंम्पनीचे कार्यालय आहे. या ठिकाणी किरणसिंग कृष्णाजी पाटील (शिवाजीनगर, यावल) यांनी आपली दुचाकी क्रमांक (एम. एच. 19 सी.एन. 6543) ही लावली असता अज्ञात चोरट्याने दुचाकी लांबवली. हा प्रकार निर्दशनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विजय पासपोळ करीत आहे.

