भुसावळातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली


The thieves stole the bike from Bhusawal भुसावळ :शहरातील खडका रोडवरील हिरा हॉलजवळून चोरट्यांनी 35 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. ही घटना बुधवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
रशीदखान गुलाबखान (68, जाम मोहल्ला, शंकर मोती यांच्या घराजवळ, भुसावळ) हे सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांच्याकडे दुचाकी (एम.एच.19 डी.ए.4704) असून त्यांनी ती खडक रोडवरील हिरा हॉलसमोरील गॅरेज समोर लावली असता चोरट्यांनी बुधवारी रात्री दहा ते अकरा दरम्यान संधी साधून दुचाकी लांबवली. तपास हवालदार अन्वर शेख करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !