अकोल्यातील विवाहितेची भुसावळ बसस्थानकातून 27 हजारांचा ऐवज असलेली पर्स लांबवली


A woman’s purse containing 27,000 was stolen from Bhusawal bus station in Akola भुसावळ : शहरातील बसस्थानकात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत भामट्याने 27 हजारांचा ऐवज असलेली अकोल्यातील महिला प्रवाशाची पर्स लांबवली. ही घटना रविवारी दुपारी दोन ते अडीच दरम्यान घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बसस्थानकात चोरटे सैराट
सुनीता मुरलीधर पहाडे (38, कऊलखेडा, न्यू खेतान नगर, जैन मंदिराजवळ, अकोला) या विवाहिता नोकरदार असून कामानिमित्त भुसावळ आल्या होत्या व काम आटोपून रविवारी दुपारी दोन वाजता बसस्थानकात बसची प्रतीक्षा करीत असताना भामट्याने त्यांची पर्स लांबवली. या पर्समध्ये 12 ग्रॅम वजनाचे व 18 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, चार ग्रॅम वजनाचे व सहा हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी व अडीच हजारांची रोकड मिळून 26 हजार 500 रुपयांचा ऐवज होता. पर्स चोरीची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास नाईक तेजस पारीसकर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !