भुसावळातील नगरपालिका कर्मचार्याच्या कामात अडथळा : एकाविरोधात गुन्हा
Obstructing municipal employee in Bhusawal : Offense against one भुसावळ : शहरातील बसस्थानकाजवळील जुन्या नगरपालिका कार्यालययाच्या गोदामातून चोरी करताना संशयिताला हटकल्यानंतर त्याने पालिका कर्मचार्याच्या कामात अडथळा आणल्याचा प्रकार सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी नगरपालिका कर्मचारी विपूल अनिल चांदेकर (39, पंधरा बंगला, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून संशयित युवराज सुरेश बिर्हाडे (जुना कोंडवाडा, भुसावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास संशयित बिर्हाडे हा नगरपालिकेच्या जुन्या इमारतीतील पत्री गोदामात शिरल्यानंतर त्यास हटकल्यानंतर संशयिताने चांदेकर यांच्याशी वाद घालत त्यांच्या कार्यात अडथळा आणला. तपास सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.

